तुझ्यामुळे ..

तुझ्यामुळे .. 

माझे फक्त शब्द , तूच त्यांचा अर्थ l 
जगणे यथार्थ तुझ्यामुळे ll 

तुझ्याच कृपेने , तुला देतो साद l 
तुझाच प्रसाद माझे काय ? ll 

दगडात प्राण फुंकतोस तूच l 
आश्चर्य तुलाच वाटे तरी ? ll 

जन्मजात होतो , बघ ना मी मुका l
केलास बोलका तूच तर ll

आईचेच मूल आईला कौतुक l
सांग पुन्हा मुक होवू का ग ? ll

काही न करता स्पर्शच पुरेसा l
मनाचा उसासा काढतेस ll 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: