" का उगाच वाळते ?..

" का उगाच वाळते ?..

प्रश्न छान टाळते ;
उत्तरास गाळते ...

वेड लागल्यामुळे ;
शब्द खूप पाळते ...

मी निमित्त आणि बघ ;
तू तुलाच भाळते ...

आठवात माझिया ;
आसवास गाळते ...

तू फुलातुनी अशी ;
का मलाच माळते ...

मी निराश आणि तू ;
का उगाच वाळते ?..

बोलते अशी जणू ;
पुस्तकास चाळते ..

-कमलाकर देसले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: